अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2021 :- पारनेर तालुक्यातील जवळा येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे.
नगर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांनी याला दुजोरा दिला. याबाबत दुपारी पत्रकार परिषदेत माहिती दिली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

जवळे येथील एका अल्पयवीन मुलीवर तिच्याच घरात अत्याचार करून तिचा खून केल्याची घटना २० आॅक्टोबर घडली होती.
याप्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्याविरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार तसेच हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या संदर्भात पीडितेच्या वडिलांनी फिर्याद दिली होती. या संवेदनशील प्रकरणाचा छडा लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. तब्बल दोन महिन्यांनंतर पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम













