अहमदनगर ब्रेकिंग ! ट्रेकिंगसाठी आलेल्या २ ट्रेनरचा डोंगरावरून पडून मृत्यू.

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, , 03 फेब्रुवारी 2022 :-   ट्रॅकिंग करतांना डोंगरावरून पडून अमोल वाघ आणि मयूर म्हस्के(रा.पाईप इंद्रप्रस्थ ट्रॅकर ग्रुपचे लाईन रोड,अहमदनगर)या दोन तरुण ट्रेकरचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मनमाड पासून जवळ कातरवाडी भागात घडलीआहे.

दरम्यान या दुर्घटनेमधील दोघे अहमदनगर येथील इंद्रप्रस्थ ट्रॅकर ग्रुपचे ट्रेनर आहेत.या प्रकरणी चांदवड पोलीस स्थानकात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अधिक माहिती अशी, मनमाड – शहरापासून चार किलोमीटरवर असलेल्या हळबीची शेंडी अर्थात अंगठ्या डोंगरावरून उतरताना पडून दोन गिर्यारोहकांचा मृत्यू झाला.

एक जण जखमी आहे. इतर १३ गिर्यारोहक सुखरूप आहेत. हे सर्व गिर्यारोहक अहमदनगर येथील इंद्रप्रस्थ ट्रेकर्स ग्रुपचे आहेत. आठ मुली आणि सात मुले असा १५ जणांचा संघ बुधवारी सकाळी गिर्यारोहणासाठी हळबीची शेंडी अर्थात अंगठ्या डोंगरावर गेले होते.

हे सर्वजण अंगठ्या डोंगरावर चढले. तेथून पुढे अंगठ्याच्या आकाराच्या सुळक्यावर त्यांनी यशस्वी चढाई केली. आधारासाठी त्यांनी खिळ्यांच्या सहाय्याने दोरखंड बांधला होता.

अंगठ्याच्या सुळक्यावरुन हे सर्व गिर्यारोहक खाली उतरत असताना सर्वात शेवटी असलेले अनुभवी गिर्यारोहक मयूर म्हस्के, अनिल वाघ आणि अजून एक जण असे तिघे घसरुन पडले.

सहकाऱ्यांनी जखमींना डोंगरावरून खाली आणण्याचा प्रयत्न केला. ग्रामस्थही मदतीला धावले. जखमींना येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe