अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2021 :- राहुरी तालुक्यातील कणगर शिवारात विहिरीत पडून २४ वर्षीय अविवाहित तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवार 22 नोव्हेंबर रोजी घडली आहे.
भारत बाबासाहेब वरघुडे असे मृत तरूणांचे नाव आहे. सोमवारी सकाळी आठच्या सुमारास भारत वरघुडे विहिरीत पडला असता त्यांच्या वडीलांनी पाहिले व आरडाओरडा सुरु केला.
गावचे सरपंच सर्जेराव घाडगे व पोलिस पाटील बाळासाहेब मुसमाडे यांनी ग्राम सुरक्षा यंत्रणावर ही माहीती दिली. तसेच सोशलमिडियावर मदतीसाठी आहवान करण्यात आले.
स्थानिक पोहणारे सुभाष वराळे,अनिल बर्डे अन्य दोघांनी भारत यास विहरीत शोधण्याचा प्रयत्न केला. राहुरीचे तहसीलदार फसियोद्दीन शेख यांनी आपत्कालीन व्यवस्थापन टीम मदतीसाठी धाडली.
मात्र तीन तासांनी भारत गळाला लागला मात्र त्यांच्या पोटात पाणी गेल्याने तो मृत झाला होता. राहुरी येथील ग्रामीण रुग्णालय शवविच्छेदन करण्यात आले.
मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला राहुरी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू नोंद करण्यात आली असून करण्यात आली असुन पोलिस पुढील तपास करत आहे.
मयत भारत याच्या पश्चात आई, वडील, विवाहित बहीण असा परिवार आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम