अहमदनगर ब्रेकींग: अज्ञात वाहनाच्या धडकेत ऊसतोड बाप-लेकाचा मृत्यू

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2021 :- अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत ऊसतोड मजुरीचे काम करणाऱ्या बाप-लेकाचा मृत्यू झाला आहे.

रावसाहेब हेरू वडते (वय ५७) व गणेश रावसाहेब वडते (वय ३०, दाेघे रा. बाेळेगाव, नागलवाडी, ता. शेवगाव) असे मृत बाप-लेकांची नावे आहेत.

अहमदनगर-पुणे महामार्गावर केडगाव शिवारात आज पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. वडते बाप-लेक ऊसतोड मजुरीचे काम करत होते.

ते अहमदनगर शहरातील बोरुडे मळ्यात ऊस तोडणीचे काम करत होते. आज पहाटे ते कामानिमित्त पुण्याला जाण्यासाठी निघाले होते.

दुचाकीवरून प्रवास करत असताना केडगाव शिवारातील हॉटेल वंदन समोर पहाटे साडेचारच्या सुमारास त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली.

या धडकेत दोघांचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती कोतवाली पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe