Ahmednagar Breaking : कामगाराने ठेकेदारालाच भोसकले, निर्घृण खून

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : रात्रीच्या वेळी आरडाओरडा व शिवीगाळ करणाऱ्या कामगाराला शांत बसा आम्हाला झोपू द्या असे म्हंटल्याचा राग आला. या कामगाराने ठेकेदाराचा चाकूने भोकसून खून केल्याची घटना घडली आहे.

सावेडी उपनगरातील गुलमोहर रोडवरील पारीजात चौक परिसरात असलेल्या तांबटकर मळा येथे ही घटना घडली. गुरुवारी (दि.२८) रात्री १०.३० च्या सुमारास हा प्रकार घडला. कमलेश कुशावह (रा. नवाबगंज, उत्तर प्रदेश, हल्ली रा. तांबटकर मळा,

पारीजात चौक, गुलमोहर रोड) असे मयताचे नाव आहे. बिंदाप्रसाद कालीदीन रावत असे आरोपीचे नाव आहे.

मयत कमलेश कुशावह हे विविध कामासाठी कामगार पुरविण्याचे काम करत होते. ते उत्तरप्रदेश मधून नगरमध्ये ४ वर्षांपूर्वी कामासाठी आलेले होते. ते सध्या तांबटकर मळा येथे त्यांचे गावाकडील चांद आलमनुर आलम खान यांचे सिमेंट ब्लॉक, कंपाउंड वगैरे तयार करण्याचे काम करत होते.

त्यांचे सोबत त्यांनी त्यांच्या गावाकडून आणखी काही मजुर कामाला होते. त्यामधे आझाद खान, संदिप कुमार, रामबाबु सिंग, अक्रम असे कामावर आहेत. सुमारे सात आठ महिन्यापासून बिंदाप्रसाद कालीदीन रावत हादेखील त्यांसोबत काम करत आहे.

गुरुवारी (दि.२८) रात्री १०.३० च्या सुमारास कमलेश, त्यांची पत्नी व मुलांनी जेवण केले व नातेवाईकाचा फोन आल्याने ते फोनवर बोलत होते. तेव्हा बिंदाप्रसाद कालीदीन रावत हा तेथे आला व मोठयाने बोलू लागला. तेव्हा कमलेश यांनी त्यास आम्ही फोनवर बोलत आहोत. तू शांत बस असे सांगितले.

यावेळी तो शिवीगाळ करू लागला. यावेळी कमलेश यांनी बिंदा यास तुला आमच्याकडे काम करायचे नसेल तर ऍडव्हान्स घेतलेले पैसे देऊन टाक असे सांगितले. याचा राग आल्याने बिंदाप्रसाद याने कमलेश यांना चाकूने भोकसले. आरडा ओरडा ऐकून अन्य कामगार तेथे आले. त्यांनी बिंदाप्रसाद कालीदीन रावत यास पकडून ठेवले व कमलेश यांस औषधोपचारासाठी शासकीय रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी कमलेश यांना मयत घोषित केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe