अहमदनगर लाईव्ह24 टीम :- कोरोना आजार हा संसर्गजन्य आजार आहे. त्यामुळे मोठया प्रमाणात नागरिकांनमध्ये संसर्ग होवू शकतो. यासाठी प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे.मनपा प्रशासनाने येत्या १५ दिवसात कठोर निर्णय घ्यावेत. समाजामध्ये जनजागृतीसाठी विविध उपाय योजना कराव्यात
शहरातील उदयाने, हॉटेल, धार्मिक स्थळे, व शहरातील विविध ठिकाणी असणा-या चौपाटया, जॉगिंग ट्रॅक, मंगल कार्यालय, शॉपिंग कॉम्प्लेक्स, या ठिकाणी मोठया प्रमाणात नागरिक एकत्र येत असतात. त्यामुळे बंद करण्याचे आदेश महापौर बाबासाहेब वाकळे यांनी दिले.
अहमदनगर मनपा हद्दीत व उपनगरामध्ये कोरोना विषाणू बाबत उपाय योजनांची तात्काळ अंमलबजावणी करण्याकरिता महापौर बाबासाहेब वाकळे यांनी बैठक घेतली. यावेळी नुतन आयुक्त श्रीकांत मायकलवार, उपमहापौर मालनताई ढोणे, महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती लताताई शेळके,
उपसभापती सुवर्णा गेणप्पा, उपायुक्त सुनिल पवार, डॉ.प्रदिप पठारे , नगरसेवक भैय्या गंधे, मनोज कोतकर, राहुल कांबळे. संजय ढोणे. अजय चितळे, अजिंक्य बोरकर, आरोग्याधिकारी डॉ.अनिल बोरगे, वैद्यकिय उपआरोग्याधिकारी डॉ.राजूरकर,
डॉ.शंकर शेडाळे, डॉ.कविता माने, डॉ.आरती डापसे, डॉ.आश्विनी मरकड, डॉ.आएशा शेख, मुख्य स्वच्छता निरिक्षक राजकुमार सारसर, एस.टी.महामंडळ तारकपूर आगाराचे अविनाश कल्हापुरे, शहर बस सेवा व्यवस्थापक रावसाहेब काकडे आदी उपस्थित होते.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com