अहमदनगर Live24 टीम, 11 फेब्रुवारी 2022 :- ड्रायव्हरचा खुन करून मृतदेह सिंधखेड राजा (जि. बुलढाणा) येथे जाळुन पुरावा नष्ट केला आणि 11 वर्ष ओळख लपवुन राहिला. तो आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अखेर जेरबंद केला, अशी माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रपरिषदेत दिली.
अभिमान ऊर्फ भरत मारूती सानप असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पाथर्डी पोलीस ठाण्यात 2011 साली फिर्यादी नितीन सखाराम सोनवणे यांनी फिर्याद दिली.
फिर्यादीचा भाऊ अनिल सोनवणे यास जबर मारहाण व घातपात करण्यासाठी अपहरण करून ट्रक मधील पाच लाख 48 हजार 940 रूपयांची बायडींग वायर बळजबरीने चोरुन नेली आहे.
गुन्हा भरत मारूती सानप (रा. खडकवाड जि. बीड) हा स्वतःचे नावात बदल करून व ओळख लपवुन राहत आहे, अशी माहिती तपास पथकास मिळाल्याने त्यांनी आरोपीचा शोध घेवून त्यास कन्हेरवाडी (ता. परळी जि. बीड) येथुन ताब्यात घेतले.
त्याने त्याचे नाव अभिमान मारूती सानप असे चुकीचे सांगितले. पोलिसांनी खाक्या दाखविताच अनिल सोनवणे याला मारून सिंधखेड राजा येथे ट्रकमधील अंथरून व पांघरून घेण्याचे कपडे व नाल्या जवळील सुकलेले गवत त्याचे अंगावर टाकुन त्यास पेटवुन देवुन तेथुन निघुन आलो, अशी कबूली त्याने दिली.
अशी पटली ओळख – गुन्हे शाखेच्या पथकाने भरत सानपला ताब्यात घेतले, परंतू तो अभिमान मारुती सानप असे चुकीचे नाव सांगुन उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला.
तसे आधारकार्ड पोलिसांना सादर केले. परंतु तपास पथकाची पुर्णखात्री होती की, सदरचा इसम हाच भरत मारुती सानप आहे.
त्यामुळे पथकाने त्यास विश्वासात घेवून त्याचेकडे कसुन चौकशी करता त्यांचेकडे असलेल्या ओळखी बाबतच्या कागदपत्रांची सखोल पडताळणी केली.
त्यामध्ये त्याचेकडे सन 2006 मधील मतदान ओळखपत्र सापडले त्यावर त्याचे नाव भरत मारुती सानप असे असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी त्याचा सातबाराही तपासला त्यावर देखील भरत मारूती सानप नाव आढळून आले. मीच भरत मारुती सानप असे असल्याचे सांगुन त्याने गुन्ह्याची कबूली दिली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम