Ahmednagar Crime News : तडीपारीचे उल्लंघन; तिघांना अटक

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2021 :-  तडीपारीचे उल्लंघन करून जिल्ह्याच्या हद्दीत बेकादेशीर राहणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. त्यांच्याविरुद्ध कोतवाली आणि भिंगार पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पवन येशू भिंगारदिवे (रा.घारगल्ली, भिंगार), गणेश शिवाजी लोखंडे (रा. लोंढेमळा,सोनेवाडी रस्ता, केडगाव) आणि सुरज संभाजी शिंदे (रा. झारेकर गल्ली, नालेगाव) हे तडीपार आरोपी आहेत.

पवन भिंगारदिवे याला नगर उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी 10 मार्च 2021 रोजी एक वर्षासाठी अहमदनगर जिल्ह्यातून तडीपार केले आहे. गणेश लोखंडे याला 25 जानेवारी 2020 रोजी तडीपार करण्यात आलेले आहे.

सुरज शिंदे याला 26 फेब्रुवारी 2021 रोजी तडीपार करण्यात आले आहे. प्रांताधिकाऱ्यांचे आदेशाचे उल्लंघन करून तिघे शहर आणि उपनगरात राहत होते.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक सोपान गोरे, उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, सहाय्यक उपनिरीक्षक संजय खंडागळे,

बापू फोलाणे, भीमराज खर्से यांच्या पथकाने या तिघांना अटक केली. त्यांच्याविरूद्ध तडीपारी आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe