Ahmednagar News : ग्रामपंचायत निवडणूक निकालाच्या वादातून राहाता तालुक्यातील निर्मळपिंप्री गावात ४०० ते ५०० जमावाने दोन कुटुंबावर जीवघेणा हावा चढविला. जमावाने घराची तोडफोड करून जाळपोळही केली.
ही घटना बुधवार दि.६ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या दरम्यान घडली. याप्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात ७१ जणांविरुद्ध मारहाण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. हल्ला झालेल्या दोन्ही कुटुंबांनी लोणी पोलीस ठाण्यात आश्रय घेतला आहे. याप्रकाराने अहमदनगर जिल्हा हादरला आहे.

या प्रकरणी ४५ वर्षीय महिलेने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, काही दिवसांपूर्वी गावातील लोकांसोबत त्यांच्या मुलाचे वाद झाले होते. मात्र, पुढे वाद गायकांच्या पुढाकाराने मिटले होते.
या प्रकरणी पोलिसांत देखील नोंद झालेली आहे. दरम्यान, बुधवार दि. ६ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता अचानक गावातील मोठा जमाव या महिलेच्या घरी नेऊन धडकला. यात काही महिलांचा देखील समावेश होता.
याच जमावातील काही लोकांनी घरात घुसुन टीव्ही उचलुन बाहेर फेकला. घरातील तीन गव्हाचे पोते बाहेर फेकले, तेंव्हा समोरील गर्दी पाहुन च गर्दीचा आवाज ऐकुन महिलेसह घरातील लोकांनी घराचा दरवाजा लावून घेतला, मात्र, त्यानंतर जमलेल्या लोकांनी दरवाजावर लाचा मारुन घरावर दगडफेक केली,
यावेळी आलेल्या जमावाने महिलेच्या घरासमोरील पाण्याची टाकी फोडली, तसेच घरासमोर असलेल्या गादया पतंग फेकुन दिले. घरासमोरील असलेले शेड पाडले. घराच्या पत्र्यावर आणि घरावर दगडफेक केली.
तसेच फिर्यादी महिलेच्या पुतण्याची घरासमोरील टाटा मंजीक गाडी पलटी करुन तिचे देखील नुकसान केले आहे. सोचतच यावेळी घरातील लहान मुलांना देखील मारहाण करण्यात आल्याचा आरोप महिलेकडून करण्यात आला आहे.
तसेच, घराच्या पाठीमागील शेळवाचे पत्र्याचे शेडनेट पिटवून देण्यात आले. दरम्यान, काही वेळात पोलीस पोहचले आणि त्यांनी जमावाला पांगविल्याने मोठा अनर्थ टळला. या प्रकरणी पोलिसांनी ७९ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेने पिडीत कुटंब प्रचंड पावरून गेले असून, त्यांनी गाव सोडत पोलीस ठाण्याचा आसरा घेतला आहे. तसेच, पोलिसांकडून देखील गावात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान काल सकाळी अप्पर पोलीस अधिक्षक स्वाती भोर, डीवायएसपी संदिप मिटके यांनी घटनास्थळाला भेटी दिल्या.
या हल्ल्यामुळे घाबरलेल्या दोन्ही कुटुंबांनी लोणी पोलीस ठाण्यात आश्रय घेतला आहे. निर्मळ पिंपरी गावात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गावात तणावपूर्ण शांतता आहे. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे. -युवराज आठरे, पोलीस निरीक्षक, लोणी
जमावाने हल्ला केल्यावर हल्लेखोरांपैकी काही जण ‘यांचं मणिपुर करा’ असे ओरडत होते. परंतु, लोणी पोलीस ठाण्याचे पोलीस वेळेत आल्याने पुढील अनर्थ टळला, अशी माहिती पिडीत कुटुंबातील सदस्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना दिली