अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2021 :- सिव्हिल हॉस्पिटल अग्नितांडवात निष्पाप बारावा बळी गेला आहे. श्री लक्ष्मण आश्राजी सावळकर वय 60 वर्षे यांचा दुर्देवी मृत्यू झाला असुन साईदीप हॉस्पिटल येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
जिल्हा रुग्णालयातील आयसीयू विभागाला लागलेल्या आगीत 11 जणांचा मृत्यू झाला होता तर जखमींवर खासगी रुग्णालयांत उपचार करण्यात येत होते.
त्या जखमींमधील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. लक्ष्मन आश्राजी सावळकर (वय 60) असे त्या मृताचे नाव आहे.
6 नोव्हेंबर रोजी जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला आग लागून 11 लोकांचा मृत्यू झाला होता. तर सहा रूग्ण जखमी झाले होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते.
यातील एकाचा आज सकाळी मृत्यू झाला आहे. आग लागली त्यावेळी अतिदक्षता विभागात १७ करोना रूग्णांवर उपचार सुरू होते.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम