अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2021 :- अवघ्या चार वर्षांच्या चिमुरडीवर एका ३२ वर्षांच्या नराधमाने अत्याचार केल्याची अत्यंत संतापजनक घटना राहाता तालुक्यात घडली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत परंतु राहाता तालुक्यात ही घटना घडली आहे.
या नराधमाने या चार वर्षीय मुलीवर तुरीच्या शेतात नेऊन अत्याचार केला. याबाबत राहाता तालुक्यातील जळगाव येथील सिकंदर हुसेन शेख ऊर्फ काल्या (वय ३२) याच्या विरोधात मुलीच्या आजीने दिलेल्या तक्रारीवरून श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात बलात्कारासह ॲट्रॉसिटी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस या आरोपीचा कसून शोध सुरू असून या प्रकरणाचा तपास उपअधीक्षक राहुल मदने व श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक मधुकर साळवे करीत आहेत. या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम