पाकिस्तानने उत्तर आणि पश्चिम भारतातील १५ लष्करी तळांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांद्वारे हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये जम्मू-काश्मीरमधील अवंतीपुरा, श्रीनगर, पठानकोट, पंजाबमधील अमृतसर, कपूरथळा, जालंधर, लुधियाना, आदमपूर, बठिंडा, चंदीगड, तसेच राजस्थानमधील नल, फलोदी, उत्तरलाई आणि गुजरातमधील भूज यासारख्या महत्त्वाच्या ठिकाणांचा समावेश होता.
मात्र, भारताने या हल्ल्यांना यशस्वीपणे तोंड दिले. भारतीय सैन्याच्या एकात्मिक काउंटर-यूएएस ग्रिड आणि प्रगत हवाई संरक्षण यंत्रणांनी पाकिस्तानचे सर्व हल्ले हाणून पाडले. या हल्ल्यांचे अवशेष देशाच्या विविध भागांत सापडले असून, हे अवशेष पाकिस्तानच्या हल्ल्याचा स्पष्ट पुरावा आहेत.

पाकिस्तानच्या रडार यंत्रणेचा नाश
भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानच्या रडार यंत्रणेला उद्ध्वस्त केले. पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर बुधवार आणि गुरुवारच्या रात्री शस्त्रसंधीचे उल्लंघन करत पुन्हा आगळीक केली. परंतु, भारताच्या अचूक हल्ल्यांमुळे पाकिस्तानच्या हवाई संरक्षण यंत्रणेला मोठा धक्का बसला आहे.
पाकिस्तानचा ड्रोन हल्ला निष्फळ
पाकिस्तानने ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करून भारतातील १५ शहरांमधील लष्करी तळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. परंतु, भारतीय सैन्याने सतर्क राहून या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर दिले आणि पाकिस्तानचा हा डाव पूर्णपणे उधळून लावला. या यशस्वी कारवाईमुळे भारतीय सैन्याच्या सामर्थ्याचा आणि सज्जतेचा प्रत्यय आला आहे.