अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2021 :- पेट्रोलच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाला आहे. अशा परिस्थितीत मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.(Petrol news)
सरकारने इथेनॉल मिश्रित पेट्रोल (EBP) कार्यक्रमांतर्गत इथेनॉलवरील GST दर 18% वरून 5% पर्यंत कमी केला आहे. पेट्रोलमध्ये मिश्रणासाठी वापरण्यात येणाऱ्या इथेनॉलवरील जीएसटीत सरकारने 13 टक्क्यांची कपात केली आहे.
सुधारित नियमानुसार जीएसटीचा दर 18 टक्क्यांवरुन 5 टक्क्यांवर पोहोचला आहे. पेट्रोलियम खात्याचे राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी लोकसभेत लेखी प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली.
पेट्रोल-डिझेल तसेच सीएनजीचा इंधनाचा वापर अधिक प्रमाणात करण्यात येतो. तसेच इंधनांच्या निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात कच्चा माल परदेशातून आयात देखील करावा लागतो.
त्यामुळे परिवहन तसेच अन्य कारणांसाठी होत असलेला इंधनाचा वापर कमी करण्यासाठी सरकारने इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन देण्याचे धोरण स्विकारले आहे.
इथेनॉलचा वापर वाढण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने धोरणात्मक पाऊल उचलण्याचे मंत्री तेली यांनी सांगितले. साखर कारखान्यांमध्ये उपपदार्थाच्या स्वरुपात इथेनॉलचे उत्पादन घेतले जाते.
भारतात उसाचे मोठे उत्पादन होते. उसाच्या रसापासून शिल्लक मळीवर प्रक्रिया करून इथिल व मिथिल अल्कोहोलची निर्मिती केली जाते.
उत्पादित इथिल अल्कोहोलचा इथेनॉल म्हणून वापरता येते. केंद्र सरकारने 2003 मध्ये पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रित करण्याचा निर्णय घेतला होता.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम