Ahmednagar Breaking : दुचाकीस्वाराला आयशर टेम्पोने चिरडले ! चाक छातीवरून गेल्याने जागीच मृत्यू…

Published on -

Ahmednagar Breaking : भरधाव वेगाने जाणाऱ्या आयशर टेम्पोने धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास तालुक्यातील चंदनापूरी जवळील आनंदवाडी परिसरात घडली.

संदीप मारुती जाधव (वय ३३, रा. वरूडी पठार, ता. संगमनेर), असे या अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. संदीप जाधव हा मंगळवारी सकाळी आपल्या (एम.एच. १७ आर २३०७) क्रमांकाच्या दुचाकीवरून नाशिक-पुणे महामार्गावरून जात होता.

चंदनापुरी शिवारातील आनंदवाडी परिसरात तो आला असता, पाठीमागून येणाऱ्या (एम. एच. १२ एल.टी. ७७९७ ) क्रमांकाच्या टेम्पोने त्याला धडक दिली. या अपघातात संदीप जाधव हा मोटरसायकल वरून खाली पडला. यावेळी टेम्पोचे चाक त्याच्या छातीवरून गेल्याने त्याचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली होती. टोल नाका कर्मचारी बाळासाहेब ढगे यांनी डोळासणे महामार्गाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना अपघाताची माहिती दिली.

माहिती मिळतात सूर्यवंशी हे आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. महामार्ग पोलिसांनी अपघातग्रस्त दोन्ही वाहने महामार्गावरून बाजूला घेतली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News