अहमदनगर ब्रेकिंग : नगर-मनमाड मार्गावर दुचाकीस्वाराचा मृत्यू

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmadnagar Braking

Ahmadnagar Braking : नगर-मनमाड मार्गावरील वाणी ओढा येथील एका हॉटेलसमोर चारचाकी वाहन व दुचाकीचा नुकताच अपघात झाला.

त्यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला असून शंकर साहेबराव खपके (रा. गुहा), असे मृताचे नाव आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, काल बुधवारी (दि.२१) सकाळी ११ वाजता शिर्डीहून नगरच्या दिशेने जात असलेल्या एमएच १५ एफव्ही ३३५० क्रमांकाच्या चारचाकी वाहनाने दुचाकीस पाठीमागून जोराची धडक दिली.

या धडकेत दुचाकीस्वार हा रस्त्याच्या विरुद्ध बाजूने उडला गेला. याचवेळी शिर्डी रस्त्यावर ऊस तोडणी कामगार घेऊन जात असलेल्या वाहनाखाली तो सापडल्याने जागीच ठार झाल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.

शंकर साहेबराव खपके (वय ५५, रा. गुहा, ता. राहुरी), असे अपघातात मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. मयत शंकर खपके यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, असा परिवार आहे.

दरम्यान, घटनास्थळी परिसरातील तरुण मंडळींनी तातडीने मदतकार्य केले. तर रुग्णवाहिका चालक रवी देवगिरे यांच्या मदतीने मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात नेण्यात आला. अपघातस्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाल्याने काही काळ वाहतुक ठप्प झाली होती.

घटनास्थळी सहायक पोलीस उपनिरीक्षक तुळशिदास गीते यांनी भेट देऊन पंचनामा केला. याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरू होती.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe