Breaking : निवडणुकांच्या धामधुमीत आमदाराच्या कुटुंबाचा भीषण अपघात ! चौघे ठार

Ahmednagarlive24 office
Published:
kiran sarnaik

अपघाताबाबत एक मोठे वृत्त समोर आले आहे. शिक्षक आमदार किरण सरनाईक (Kiran Sarnaik) यांच्या कुटुंबातील गाडीचा मोठा अपघात झालाय.

आज शुक्रवारी दुपारी अकोला जिल्ह्यात पातूर शहराजवळ ही दुर्घटना घडली आहे. या अपघातामध्ये आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील व्यक्तींसह चार लोक मृत्युमुखी पडले आहेत.

या मृतांमध्ये किरण सरनाईक यांचे पुतणे रघुवीर सरनाईक यांचाही समावेश असून जखमी झालेल्याना अकोल्यातील रुग्णालयात दाखल केले आहे. या अपघातामध्ये रघुवीर सरनाईक (वय २८),

शिवाजी आमले (वय ३०), सिद्धार्थ यशवंत इंगळे (वय ३५), नऊ महिन्यांच्या मुलगा आदी चार जणांचा मृत्यू झाला असून पियुष देशमुख (वय ११), सपना देशमुख आणि श्रेयस इंगळे हे तीन जण जखमी झाले आहे.

दरम्यान या अपघातामागचे कारण नेमके काय आहे हे समजू शकले नव्हते. परंतु दोन कारची समोरासमोर जोरदार धडक झाल्याचे प्रथमदर्शनी समजले आहे.

ही धडक इतकी भीषण होती की दोन्ही कारचा चक्काचूर झाला असून पाच मृत झालेत. दरम्यान घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला व स्थानिकांच्या मदतीने मदतकार्य सुरु केले होते.

या भीषण अपघातात काही जण जखमी झाले असल्याची माहिती मिळाली आहे. या जखमींना तातडीने अकोल्याच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी नेण्यात आले होते. दरम्यान हा अपघात घडल्यानंतर रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे पहायाला मिळाले.

पातूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकऱ्या सुरु केले होते. अपघातातील मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात नेण्यात आल्याचेही समजते. दरम्यान या अपघाताबाबत अधिक तपास सध्या पोलीस करत आहेत.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe