Ahmadnagar Breaking : अवैध सावकारीबाबत जिल्हा उपनिबंधकांकडे आलेल्या तक्रारीची चौकशी होऊन दोन सावकारांविरोधात तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहकार अधिकारी शेख अल्ताफ अब्दुलकादर (वय ४१ रा. आलमगीर, भिंगार) यांनी फिर्याद दिली आहे.
सचिन आदिनाथ ताठे (रा. ताठे मळा, बालिकाश्रम रस्ता, सावेडी) व दत्तात्रय मच्छिंद्र कजवे (रा. बाभुळगाव, ता. राहुरी) अशी गुन्हा दाखल झालेल्या सावकारांची नावे आहेत.
अल्ताफ गुलाब सय्यद (रा. गांधीनगर, बोल्हेगाव) यांनी सचिन ताठे व दत्तात्रय कजबे यांच्या विरोधात अवैध सावकारीबाबत तक्रार केली होती. पथकाने १८ मे रोजी सचिन ताठे याच्या घराची झडती घेतली.
मारूती व्हॅन त्याच्याकडे मिळून आली. पथकाने ती जप्त करून संबंधीतास परत दिली. सचिन ताठे सय्यद यांना प्रॉमिसरी नोटवर ७० हजार रूपये व्याजाने दिलेल्या रकमेची नोंद नोंदवहीत नसल्याचे समोर आले.
दत्तात्रय कजबे याच्या विरोधात आलेल्या तक्रार अर्जाच्या अनुषंगाने सय्यद व कजबे यांची ८ जून रोजी सुनावणी घेण्यात आली होती. त्यावेळी तक्रारदार सय्यद यांनी केलेल्या तक्रार अर्जातील वाहन माझ्याकडे होते व ते मी टकले (पूर्ण नाव माहिती नाही) यांना विकल्याची कजबे याने कबूली दिली.