Ahmadnagar Breaking : नगर शहरातून वाहणाऱ्या सीना नदीत अज्ञात – इसमाने केमीकल व घाण सोडून – सार्वजनिक पाणी दूषित केले. – जनतेच्या तसेच सीना नदीच्या – परिसरात राहणाऱ्या नागरीकांना धोका – पोहचेल,
असे कृत्य करुन पर्यावरणाची हानी केल्याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उप प्रादेशिक अधिकारी चंद्रकांत – नरहरराव शिंदे यांनी फिर्याद दिली – आहे. शुक्रवारी मध्यरात्री पंपिंग स्टेशन परिसरात अचानक उग्र वासामुळे दुर्गंधी सुटली होती.
नागरिकांना श्वास घ्यायलाही त्रास होत होता. भीतीपोटी शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले. स्थानिक नागरिकांनी परीसरात शोध घेतल्यानंतर सीना नदी पात्रात केमिकल सोडल्याने फेसाळलेले पाणी वाहताना आढळून आले.
महापालिका व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला याची माहिती देण्यात आली. दुसऱ्या दिवशी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून नमुनेही घेतले. या प्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाने आता पोलिसात फिर्याद दिली आहे. पाहणीदरम्यान नदी पात्रात केमिकल व ऑईल पाण्यावर तरंगताना आढळून आले आहे.