अहमदनगर Live24 टीम, 05 जानेवारी 2022 :- पंचायत समितीचे माजी सदस्य गोविंद अण्णा मोकाटे याच्या विरोधात येथील तोफखाना पोलीस ठाण्यात अत्याचार, अॅट्रोसिटी कलमान्वये गुन्हा दाखल आहे.
या गुन्ह्याचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशानंतर अहमदनगर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे.
दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर मोकाटे पसार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोधू सुरू आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अहमदनगर शहराच्या एका उपनगरात राहणार्या तरूणीने मोकाटेच्या विरोधात तोफखान्यात अत्याचाराची फिर्याद दिली होती.
त्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर त्या गुन्ह्यात वाढीव अॅट्रोसिटीचे कलम लावण्यात आले होते. अॅट्रोसिटी कलम लावण्यानंतर सदरचा गुन्हा अहदनगर शहर पोलीस उपअधीक्षक अनिल कातकडे यांच्याकडे वर्ग झाला होता.
त्यांच्याकडून सदरचा तपास ग्रामीण पोलीस उपअधीक्षक पाटील यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. मोकाटेविरोधात अॅट्रोसिटीचे वाढीव कलम लावण्यात आले आहे.
मोकाटेविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर राजकीय आरोप-प्रत्योराप झाले आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर मोकाटे पसार झाला असून त्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम