पत्नीच्या खुनाचा प्रयत्न करणाऱ्यास सक्तमजुरी.

Published on -

अहमदनगर :- ऑगस्ट २०१७ मध्ये कुरणदरा (ता. राहुरी) येथे पत्नीच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोषी ठरवून न्यायालयाने आरोपीला ७ वर्षे सक्तमजुरी व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. 

गोपीनाथ नाथू केदार (३८, कुरंदरा शेरी चिखलठाण, ता. राहुरी) असे आरोपीचे नाव आहे. जिल्हा सत्र न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी गुरुवारी दुपारी हा निकाल दिला. या खटल्यात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अनिल सरोदे यांनी काम पाहिले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe