अहमदनगर :- नगर- सोलापूर रस्त्यावरील वाळुंज टोलनाक्याजवळ एक व्यक्ती गावठी कट्टा विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली. त्यानुसार पवार यांच्या पथकाने टोलनाक्याजवळ सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.
४० हजारचा गावठी कट्टा हस्तगत

शौकत दादा शेख (२२, रा. जामा मस्जिदजवळ, घोगरगाव, ता. श्रीगोंदे) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून ४० हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा हस्तगत करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक राेहन खंडागळे, पोलिस नाईक संदीप घोडके, रवींद्र कर्डिले, मल्लिकार्जुन बनकर, राहुल सोळुंके, रवी सोनटक्के, रणजित जाधव, कमलेश पाथरूट, बाळासाहेब भोपळे आदींनी ही कारवाई केली.