जामखेड :- मुलीचा विवाह जमला, सुपारी फुटली. मात्र, विवाहाचा खर्च कसा करायचा, या विवंचनेत असलेल्या मुलीच्या पित्याने विषारी औषध प्राषन करून आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील बावी शिवारात घडली.
भैरवनाथ नवनाथ राक्षे (वय ४६) रा. धोंडपारगाव असे मृत व्यक्तीचे नाव आहे. भैरवनाथ राक्षे हे शेतीसाठी लाकडी अवजारे बनवायचा व्यावसाय करत होते. मात्र, बदल्या काळानुसार हा व्यवसाय डबघाईस आल्याामुळे राक्षे हे आर्थिक अडचणीत आले होता.

त्यातच मुलीचे लग्न जमले व दोनच दिवसांपूर्वी मुलीच्या लग्नाची सुपारीदेखील फुटली होती. तेव्हापासून ते मुलीच्या लग्नाच्या विवंचनेत होते.
शनिवारी सकाळी ते घरातून कोणालाही न सांगता घराबाहेर पडले व घरी न आल्याने घरातील लोकांनी त्यांचा शोध घेतला. मात्र, त्यांचा तपास न लागल्याने जामखेड पोलीस स्टेशनला हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली.
त्यानंतर चार दिवसांनी त्यांचा मृतदेह धोंडपारगावज़वळ बावी शिवारातील प्रकाश चोखा साळवे यांच्या शेतातील गट नं ६३ मध्ये कुजलेल्या अवस्थेत आढळला. मृतदेहाज़वळ विषारी औषध प्राषन केलेली बाटली आढळली.