अहमदनगर Live24 टीम, 06 जानेवारी 2022 :- भारतीय जनता पार्टीचे पाथर्डी तालुका सरचिटणीस अदिनाथ धायतडक यांना व्हाट्स अॅपवरुन जिवे मारण्याची धमकी देण्याची घटना काल रात्री घडली आहे.
या बाबत पाथर्डी पोलिसाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांना दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे की, मंगळवारी रात्री माझ्या वैयक्तीक मोबाईल क्रमांकावर एका अज्ञात व्यक्तीने चँटींग करायला सुरुवात केली.

त्यावेळी धायतडक यांनी माझा वाढदिवस नसतांना तु का पोष्ट टाकून मला भावी पंचायत समितीचा सदस्य म्हणून शुभेच्छा दिल्या असे विचारले.
त्यावर त्याने व्हाट्सअॅप संदेशावर तुम्ही माझ्या नंबरचा शोध घेवू नका, माझ्या नंबरची चौकशी करु नका अन्यथा मी आत्महत्या करील किंवा तुम्हाला जिवे मारीन अशी धमकी दिली.
या बाबत भाजपाचे तालुका सरचिटणीस अदिनाथ धायतडक यांनी पाथर्डी पोलीसाकडे जावून रितसर फिर्याद दाखल केली आहे. पुढील तपास पो.हे. कॉ कृष्णा बडे करीत आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम