अहमदनगर ब्रेकिंग : अपघातात अंगावर चाक जाऊन शेतकऱ्याचा मृत्यू

Published on -

Ahmadnagar Braking : नेवासा तालुक्यातील तामसवाडी येथे शेतात हार्वेस्टरने ऊस तोडणी चालु असताना ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा धक्का लागल्याने अंगावर चाक जाऊन बाळासाहेब अंबादास जगताप वय (५०) या शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत स्थानिक सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की तामसवाडी येथील प्रगतशील शेतकरी बाळासाहेब अंबादास जगताप यांच्या शेतात भाऊबिजेच्या दिवशी हार्वेस्टर मशिनने ऊस तोडणी सुरू होती.

शेतात पडलेले उसाचे टिपरे ते गोळा करीत होते. दरम्यान ऊस वाहतुक करणारा ट्रॅक्टर वळत असताना जगताप यांना ट्रॅक्टरचा धक्का गला व त्यांचा तोल जाऊन ते चाकाखाली सापडले.

बाजुला उभ्या असलेल्या कामगारांच्या लक्षात ही घटना आली. तातडीने धावपळ करुन गंभीर जखमी अवस्थेत त्यांना नेवासा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार चालु आसताना त्यांचे निधन झाले.

अतिशय कष्टाळू व सर्वाशी मनमिळावू स्वभाव असलेले मोठ्या कुटुंबातील शेतकरी बाळासाहेब जगताप यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, चार बंधु, बहिण, पुतणे, पुतण्या, नातवंडे असा मोठा परिवार आहे. मुळा कारखान्याचे माजी संचालक बाबासाहेब जगताप यांचे ते बंधु, उद्योजक देविदास जगताप यांचे चुलते होत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe