अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2021 :- मोठ्या आशेने केलेल्या कांदा पिकातून फायदा होण्या ऐवजी शेतकऱ्याला आर्थिक नुकसानच सहन करावे लागत आहे. दरवर्षी या कांद्याला जास्तीचा दर मिळत असल्यामुळे बरेच शेतकरी या कांद्याची लागवड करतात.
कांदा हे नगदी पिक असले तरी तेवढेच बेभरवश्याचे आहे. मग ते उत्पादनात असो की दरामध्ये. गेल्या आठवड्यात कुठे दर स्थिर होत होते. मात्र, दोन दिवसांपूर्वीचे अहमदनगर येथील दर शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

कारण येथील बाजार पेठेत कांद्याला केवळ 400 रुपये प्रती क्विंटलचा दर मिळाला होता. त्यामुळे कधी ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या कांद्याने आता मात्र, शेतकऱ्यांच्या वांदा केला आहे. एका एकर क्षेत्रात १५० ते २०० पिशव्या निघणाऱ्या शेतात ५० ते ६० पिशव्या निघत आहेत.
कमी निघणाऱ्या मालामुळे तसेच हवामानातील बदलामुळे कांदे व्यवस्थित पोसले नाही. त्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे जेवढे भांडवल घातले आहे ते सुद्धा निघणे कठीण झाले आहे.
एकरी ५० हजार रुपये खर्च या कांद्यासाठी येतो. या वर्षीच्या दरामुळे अत्यंत बिकट परिस्थितीची शेतकऱ्यावर वेळ आली आहे. कांद्याच्या दरात कायम चढ-उतार होत असतात.
पावसामुळे खरिपातील कांदा बाजारपेठेत दाखलच झाला नव्हता, त्यामुळे कांदा चाळीत साठवलेला कांदा शेतकऱ्यांनी विक्रीसाठी काढला.
त्यामुळे आवक कमी असल्याने चांगला दर मिळाला होता. मात्र, दोन दिवसांपूर्वी अहमदनगर येथील बाजारपेठेत केवळ 4 रुपये किलोच्या दराप्रमाणे शेतकऱ्यांना कांद्याची विक्री करावी लागत आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम