प्रतीक काळे आत्महत्याप्रकरणी ‘या’ चौघांना अटक

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 01 नोव्हेंबर 2021 :- एके काळी प्रशांत गडाख यांचा स्वीय सहाय्यक असेलेल्या प्रतिक काळेने आत्महत्या केली होती.

एमआडीसी पोलिसांनी मयत प्रतिकची बहिण कु. प्रतिक्षा बाळासाहेब काळे (वय २३ ह धंदा, शिक्षण, रा.तेलकुडगाव, ता. नेवासा, जि. नगर) हिने दिलेल्या फिर्यादीनुसार सात जणांविरुध्द गुन्हा दाखल केला होता.

दरम्यान या आत्महत्याप्रकरणी एकूण चार जणांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये महेश कदम, विनायक देशमुख, राहुल राजळे, व्यंकटेश बेल्हेकर आदींचा अटकेमध्ये समावेश आहे.

दरम्यान, मयत प्रतिक काळेने आत्महत्या करण्यापूर्वी जी सुसाईड नोट लिहिली होती, सात जणांविरुध्द खूपच गंभीर आरोप केलेले आहेत.

या सुसाईड नोटसह मयत प्रतिकने जो व्हिडिओ आणि ओडियो तयार केला होता, हे दोन्हीही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.

मयत प्रतिकने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या पत्रात आणि ऑडियोमध्ये मंत्री गडाख यांचे सुपुत्र उदयन गडाख याचा या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचे म्हटले आहे. तर प्रशांत गडाख आणि पत्नी स्व. गौरी गडाख यांना देवमाणसं म्हटलं आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe