Gas Cylinder Price Hike : महिन्याच्या पहिल्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना मोठा झटका बसलाय. खरं तर गेल्या काही वर्षांपासून वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता पार मेटाकुटीला आली आहे. इंधन, खाद्यतेल, डाळी, इत्यादी वस्तूच्या किमती सातत्याने वाढत आहेत. गॅस सिलेंडरच्या किमती देखील खूपच वाढल्या आहेत.
खरंतर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी गॅस सिलेंडरच्या किमती बदलत असतात. सप्टेंबर महिन्यातही गॅस सिलेंडरच्या किमती बदलणार असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात होता. यानुसार, आज गॅस सिलेंडरच्या किमती वाढवल्या गेल्या आहेत.
तेल विपणन कंपन्यांनी सप्टेंबरच्या पहिल्याच दिवशी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत बदल केला आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत थेट 39 रुपयांनी वाढवण्यात आली आहे.
विशेष म्हणजे गेल्या महिन्यातही व्यवसायिक गॅस सिलेंडरची किंमत वाढवण्यात आली होती. गेल्या महिन्यात अर्थातच ऑगस्टमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 8.50 रुपयांनी वाढवली गेली होती.
जुलैमध्ये मात्र याच्या किमती कमी झाल्या होत्या. जुलै 2024 मध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत तब्बल 30 रुपयांनी कमी करण्यात आली होती.
आता सप्टेंबर महिन्यात याच्या किमती वाढवल्या गेल्या आहेत. अशा परिस्थितीत आता आपण देशातील प्रमुख शहरांमधील व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या नवीन किमती थोडक्यात जाणून घेणार आहोत.
नवीन दर कसे आहेत?
मुंबईत 19 किलोचा व्यावसायिक गॅस सिलेंडर आधी 1605 रुपयांना मिळत होता मात्र आता यामध्ये 39 रुपयांची वाढ झाली असून याची किंमत 1644 एवढी झाली आहे.
कोलकात्यात या सिलिंडरची किंमत 1764.50 रुपयांवरून 1802.50 रुपये झाली आहे.
चेन्नईमध्ये 19 किलोचा सिलेंडर आधी 1817 रुपयांना मिळत होता मात्र आता तोच सिलिंडर 1855 रुपयांना मिळणार आहे.
घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत बदल झालाय का?
गेल्या काही महिन्यांपासून घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणताच बदल झालेला नाही. यामुळे सप्टेंबर मध्ये घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती बदलतील असे वाटत होते.
मात्र घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती सप्टेंबर मध्ये ही कायम आहेत. तेल विपणन कंपन्यांनी 14.2 किलो वजनी घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत आजही कोणताच बदल केलेला नाही.