Govinda Health Update : प्रसिद्ध अभिनेता गोविंदा गेल्या काही दिवसांपासून आपल्या खाजगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत राहिला आहे. गोविंदाची पत्नी सुनिता अहुजा दररोज काही ना काही स्फोटक वक्तव्य करत असते. तिच्या वक्तव्यावरून दोघा पती-पत्नीमध्ये सगळं काही अलबेल नसल्याच स्पष्टपणे दिसतं.
दरम्यान, गोविंदाच्या अफेअरची देखील गेल्या काही दिवसांपासून मोठी चर्चा सुरू आहे. तो एका मराठी अभिनेत्रीला डेट करतोय अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगलेल्या आहेत. याच दरम्यान अभिनेता गोविंदाची प्रकृती अचानक बिघडलीये.

काल त्याला मुंबईतील क्रिटिकल केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथे त्यावर उपचार सुरू आहेत. पण आता गोविंदाची तब्येत कशी आहे ? याबाबत डॉक्टरांनी आणि त्यांच्या वकिलांनी महत्त्वाची अपडेट दिली आहे.
गोविंदा दवाखान्यात कधी भरती झाला?
गोविंदाचे सहकारी आणि कायदेशीर सल्लागार ललित बिंदल यांनी गोविंदा रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती दिली. ललित यांनी सांगितले की, मंगळवारी संध्याकाळी साडे आठ वाजेच्या आसपास गोविंदा अचानक बेशुद्ध झाला.
बेशुद्ध झाल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गोविंदाला काही औषधे देण्यात आली परंतु त्याची प्रकृती आणखी बिघडत गेली. यामुळे त्यांना ताबडतोब दवाखान्यात नेले. मध्यरात्री 1 वाजता जुहू येथील क्रिटिकल केअर हॉस्पिटलमध्ये गोविंदाला दाखल करण्यात आले.
ललितनेच गोविंदाला रुग्णालयात नेले. त्यांच्या मते, गोविंदाच्या सध्या सर्व आवश्यक चाचण्या सुरू आहेत. तो डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. गोविंदाची प्रकृती सध्या स्थिर आहे आणि चाचण्यांच्या निकालांच्या आधारे डॉक्टर त्याच्यावर उपचार करणार आहेत.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की गेल्या वर्षी गोविंदाच्या पायाला गोळी लागली होती तेव्हा पण त्याला दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी ऑपरेशन करून गोविंदाच्या गुडघ्याला लागलेली गोळी करण्यात आली होती.
त्याच्या स्वतःच्या रिवाल्वर मधून ही गोळी चुकूनत्याला लागली होती. त्यावेळी सुद्धा तो जुहू येथील क्रिटिकल केअर हॉस्पिटलमध्ये भर्ती होता. दरम्यान आता आपण गोविंदाच्या हेल्थ बाबत डॉक्टरांनी काय अपडेट दिली आहे याविषयी माहिती पाहूया.
डॉक्टर काय सांगतायत?
क्रिटिकेअर हॉस्पिटलचे डॉ. दीपक नामजोशी यांनी गोविंदाबाबत मोठी माहिती दिली आहे. डॉक्टर नामजोशी यांनी सांगितल्याप्रमाणे, गोविंदाची प्रकृती सध्या ठीक आहे आणि तो सध्या त्याच्या खोलीत आराम करत आहे.
गोविंदाच्या काही टेस्ट करण्यात आलेल्या आहेत पण त्याच्या वैद्यकीय चाचण्यांचे निकाल अद्याप आलेले नाहीत, परंतु सध्या त्याच्या प्रकृतीबद्दल काळजी करण्याची गरज नाही. खरेतर, काल धर्मेंद्रला पाहण्यासाठी गोविंदाने स्वतः गाडी चालवली होती अन ते ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये गेले होते.













