अहमदनगर ब्रेकिंग : ग्रामपंचायत सदस्याचे अपघाती निधन ! शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar Breaking : संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील निशिकांत सोन्याबापू बर्डे (वय २७) या तरुणाचा सोमवारी रात्री अपघातात दुर्दैवी निधन झाल्याची घटना घडली. काल मंगळवारी या तरुणावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, आश्वी खुर्द येथील निशिकांत बर्डे हा तरुण राहाता येथील बंधन बॅकेत नोकरी करत होता. नेहमीप्रमाणे सोमवारी तो कामावर गेला होता.

सायंकाळी अंदाजे ८ ते ९ वाजेच्या दरम्यान राहत्याहून दुचाकीवरून घराच्या दिशेने येत होता. याचकाळात जोरदार पाऊस सुरू असल्याने समोरुन येणाऱ्या वाहनाने निशिकांत बर्डे यांच्या दुचाकीला निर्मळ पिंप्री- लोणी रस्त्यावर हुलकावणी दिली. त्यामुळे झालेल्या भीषण आपघातात बर्डे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.

त्यामुळे या तरुणाला उपचारासाठी लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू या तरुणाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. काल मंगळवारी शवविच्छेदन झाल्यानंतर आश्वी खुर्द येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

दहा तरुण आश्वी खुर्द ग्रामपंचायतीचा विद्यमान सदस्य होता. तर त्याचा विविध धार्मिक व सामाजिक कार्यात सहभाग असल्याने त्याचा मोठा मित्र परिवार होता. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई, एक भाऊ, भावजय, दोन बहिणी, असा मोठा परिवार असून त्यांच्या अकस्मात व दुर्दैवी मृत्यूमुळे आश्वीसह पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe