‘त्या’ दोन मंत्र्यांकडून पत्नींचा छळ; लवकरच त्यांचा माझ्या पक्षात प्रवेश- करूणा मुंडे यांची माहिती

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2022 :- राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना पक्षाचे दोन मंत्र्यांकडून त्यांच्या पत्नीचा छळ होत असून त्यांनी आपल्याशी संपर्क केला आहे. त्या लवकरच माझ्या शिवशक्ती सेना पक्षात प्रवेश करण्यास असल्याची माहिती शिवशक्ती सेना पक्षाच्या प्रमुख करूणा धनंजय मुंडे यांनी दिली.

मात्र त्या मंत्री पत्नीचे नावे अत्ताच जाहीर करण्यास त्यांनी नकार दिला. करूणा धनंजय मुंडे दोन दिवशीय अहमदनगर जिल्हा दौर्‍यावर आहेत. सोमवारी त्यांनी अहमदनगर शहरात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी शिवशक्ती सेना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भाऊसाहेब शिंदे, सचिव रवी डवळे, कोशाध्यक्ष मुरली धात्रक, प्रवक्ते अजय चेडे आदी उपस्थित होते.

करूणा मुंडे म्हणाल्या, राज्यभर माझे दौरे सुरू आहेत. यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रमाणे भ्रष्टाचार व घराणेशाही संपविण्याची मी मोहीम सुरू केली आहे. भयमुक्त महाराष्ट्र करायचा आहे. मी घरातून बाहेर पडल्यामुळे अनेक महिलांना हिंमत मिळू लागली आहे.

राज्यातील दोन मंत्र्यांच्या पत्नी माझ्या पक्षात येण्यास तयार झाल्या आहेत. मला असे वाटते की हे खूप मोठे महिला सशक्तीकरणाचे काम आहे. कारण कोणत्याही मंत्र्याची पत्नी स्वतःच्या पती विरोधात गेली नाही. असा महाराष्ट्राचा इतिहास आहे. मी जी सुरवात केली आहे.

त्यामुळे दोन मंत्र्यांच्या पत्नी माझ्या पक्षात यायला तयार आहेत, असे त्यांनी सांगितले. त्या पुढे म्हणाल्या, मी माझा पक्ष काढून राज्यभर जात असल्याने माझे पती धनंजय मुंडे मला घरात बसण्यासाठी माझ्यावर दबाव आणत आहे. मात्र मी हाती घेतलेला लढा सुरूच ठेवणार आहे.

मी नुकताच औरंगाबाद जिल्ह्याच्या दौर्‍यावर गेले असता त्या ठिकाणी माझे पती मंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी येऊन माझी सभा रोखण्याचा प्रयत्न केला.

अशा प्रकारचे कृत्य सध्या सुरू आहे मात्र न डगमगता माझे कार्य पुढे सुरू करणार आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले. विधानपरिषदेची अहमदनगरची जाग रिक्त होत असून या जागेसाठी कधीही निवडणूक लागू शकते.

ती निवडणूक व आगामी काळामध्ये होणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आमचा पक्ष लढवणार असल्याचे ही करुणा मुंडे यांनी यावेळी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe