अहमदनगर Live24 ,31 मे 2020 : अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था NASA ने ९ वर्षांनंतर अखेर इतिहास रचला. आपल्या भूमीतून खासगी कंपनीच्या रॉकेटमधून अंतराळात दोन अंतराळवीरांना पाठवण्यात यश आलं.
पहिल्यांदाच खासगी कंपनीच्या रॉकेटमधून अशापद्धतीनं अंतराळवीर पाठवण्यात आले आहेत. फ्लोरिडाच्या केप कनव्हरल येथील जॉन एफ केनेडी अंतराळ संशोधन केंद्रातून NASA-SpaceX Demo-2 mission यशस्वीरित्या लाँच करण्यात आले.
अमेरिकेने ९ वर्षांत प्रथमच आपल्या भूमीवरून अंतराळात (Astronauts) अंतराळवीर पाठवले. नासाचे अॅडमिनिस्ट्रेटर जिम ब्राइडेनस्टीन यांनी या लाँचबद्दल माहिती दिली.
चंद्रावर पहिले पाऊल ठेवण्यासाठी पृथ्वीवरून याच जॉन एफ केनेडी केंद्रातून यानेने उड्डाण घेतले होते, असं ते म्हणाले. याआधी अमेरिका रशियाची मदत घेत होते.
याआधी चंद्रावर पहिलं पाऊल ठेवण्यासाठी जॉन एफ केनेडी सेंटरवरून उड्डाण घेण्यात आलं होतं अशी माहिती नासाच्या अॅडमिनिस्ट्रेटर जिम ब्रायडेनस्टीन यांनी दिली.
ब्रायडेनस्टीन आपल्या ट्वीटमध्ये म्हणतात, 9 वर्षांत पहिल्यांदा अमेरिकेच्या भूमीवरून रॉकेटमार्फत अंतराळवीर पाठवण्यात आले आहेत.
मला नासा आणि स्पेस टीमचा खूप अभिमान आहे’ अमेरिकेच्या वेळेनुसार दुपारी ३ वाजून २२ मिनिटांनी हे रॉकेट लाँच करण्यात आले. सर्व तयारी केल्यानंतर दोन्ही अंतराळवीर SpaceX रॉकेटमध्ये उड्डाणासाठी सज्ज होते.
काउंटडाऊन संपताच यानाने अवकाशाकडे झेपावले आणि अमेरिकेत आनंद वातावरण निर्माण झालं. याआधी बुधवारी खराब हवामानामुळे हे या रॉकेटचे लाँचिंग नियोजित वेळेच्या १६ मिनिटं आधी थांबवण्यात आलं होतं.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews