उद्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 28  डिसेंबर 2021 :-   अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीचा उद्घाटन समारंभ उद्या,२९ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते तसेच ग्रामविकास व कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.(District Collector’s)

अशी माहिती या कार्यक्रमाचे निमंत्रक जिल्हाधिकारी डॉ.राजेन्द्र भोसले व अधीक्षक अभियंता जयंत कुलकर्णी यांनी दिली आहे. मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, महसूल, ग्रामविकास, बंदरे,

खार जमिनी विकास व विशेष सहाय्य राज्यमंत्री अब्दुल सत्तार, नगरविकास, उर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्र शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे,

महापौर सौ. रोहिणी शेंडगे, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. राजश्री घुले पाटील, शिर्डी श्री.साईबाबा संस्थानचे अध्यक्ष तथा आमदार आशुतोष काळे,

खासदार सदाशिवराव लोखंडे, खासदार सुजय विखे-पाटील, तसेच जिल्ह्यातील विधानसभा व विधानपरिषद चे सर्व सदस्य व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe