अहमदनगर महापालिकेची जागा बळकावण्याचा डाव; अज्ञातांनी सार्वजनिक शौचालय केली जमिनदोस्त

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2021 :- महानगरपालिकेने बांधलेले सार्वजनिक शौचालय अज्ञातांनी रात्रीतून जमीनदोस्त केले. शहरातील झारेकर गल्लीत हा प्रकार घडला.

अज्ञातांनी 24 पैकी 18 सार्वजनिक शौचालये रात्रीतून जमिनदोस्त केले. सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर शहरात मोठ्या चर्चेला उधाण आले आहे.

दरम्यान याप्रकरणी महानगरपालिकेने गुन्हा दाखल करून तातडीने नव्याने शौचालय बांधून द्यावेत, अशी मागणी प्रभागातल्या भाजप नगरसेविका सोनाली अजय चितळे यांनी केली आहे.

18 सार्वजनिक शौचालये जमिनदोस्त करून जागा बळकवण्याच्या उद्देशातून हा प्रकार झाला असावा अशी मोठी चर्चा शहरात आहे.

मनपा आयुक्त यावर काय भूमिका घेतात, प्रभागातल्या नगरसेवकांची यावर काय भूमिका असणार याकडे आता सर्वांचे लक्ष आहे.

हे सार्वजनिक शौचालय परिसरातील नागरिक वापरत होते. शौचालय पाडल्याने नागरिकांची मोठी कुचंबणा झाली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe