अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2021 :- एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण झाले पाहिजे, ही मागणी पूर्ण झाल्याशिवाय माघार नाही, असे स्पष्ट करत यापुढे संप तीव्र केला जाईल, असा इशारा विधीज्ञ गुणरत्न सदावर्ते यांनी दिला.
विधीज्ञ सदावर्ते यांनी आज अहमदनगरमधील तारकपूर आगारातील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदाेलनाविषयी पत्रकारांसमाेर बाजू मांडली.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, काॅंग्रेस नेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थाेरात, परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर एसटी कर्मचाऱ्यांच्या संपबाबत घेतलेल्या भूमिकेवर विधीज्ञ सदावर्ते यांनी जाेरदार टीका केली.
इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लावून देश जिंकला. परंतु त्यानंतर काय झाले, याची आठवण सदावर्ते यांनी करून दिली. सदावर्ते म्हणाले, या जिल्ह्यातून महसूलमंत्री बाळासाहेब थाेरात राज्याचे आणि देशाचे प्रतिनिधीत्व करतात.
त्यांच्याच जिल्ह्यात एसटी कर्मचाऱ्यांचे हाल सुरू आहे. एसटी कर्मचारी सुभाष तेलाेरे आणि दिलीप काकडे यांनी वीरमरण पत्करले.
राज्याचे महसूलमंत्री थाेरात त्यांच्या जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांची काळजी घेण्यास कमी पडत आहेत. अशाेक चव्हाण यांनी भरपाई म्हणून ५० लाख रुपयांचा प्रस्ताव पाठवला.
थाेरात यांनी देखील त्याचपद्धतीने तेलाेरे आणि काकडे यांच्याबाबत भूमिका घ्यावी, असेही सदावर्ते म्हणाले. थाेरात यांनी बाेटचेपी भूमिका न साेडल्यास कष्टकरी माफ करणार नाही.
या आंदाेलनात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, प्रकाश आंबेडकर जाेडले आहे, हे देखील त्यांनी लक्षात घ्यावे, असेही सदावर्ते यांनी म्हटले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम