महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारची नवीन योजना! ‘या’ पिकांची लागवड केल्यास शेतकऱ्यांना मिळणार 50 हजार रुपयांची मदत

Published on -

Maharashtra Farmer : राज्यातील शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारकडून नवा उपक्रम हाती घेण्यात आला आहे आणि या अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंतचा लाभ मिळणार आहे. नक्कीच आता तुम्हाला या उपक्रमाबाबत सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल.

चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया महाराष्ट्र राज्य शासनाचा हा अभिनव उपक्रम नेमका काय आहे आणि याचा शेतकऱ्यांना फायदा घ्यायचा असेल तर त्यांना काय करावे लागेल.

 कसा आहे राज्य शासनाचा अभिनव उपक्रम?

 मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून रब्बी हंगामासाठी पीक स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. या पिक स्पर्धेच्या माध्यमातून विजेत्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार असून याच्या अर्ज प्रक्रियेला नुकतीच सुरुवात झाली आहे.

म्हणजेच या पीक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना सर्वप्रथम नाव नोंदणी करावी लागणार आहे. नाव नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनाच पीक स्पर्धेत सहभागी होता येणार आहे आणि मग पीक स्पर्धेत जे शेतकरी चांगली कामगिरी करतील त्यांना शासनाकडून प्रोत्साहन म्हणून बक्षीस देण्यात येणार आहे.

सरकारने महाराष्ट्रातील पीक उत्पादकता वाढवण्यासाठी रब्बी हंगामात पीक स्पर्धा आयोजित केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार रब्बी हंगामात उत्पादित केल्या जाणाऱ्या ज्वारी, गहू, हरभरा, करडई आणि जवस या पिकांचा या स्पर्धेत समावेश करण्यात आला आहे.

म्हणजेच या पिकांचे सर्वाधिक उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याला 50 हजार रुपये मिळणार आहेत. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या आणि राज्य स्तरावर पहिल्या येणाऱ्या शेतकऱ्याला 50 हजार रुपयांचे बक्षीस मिळणार आहे.

विशेष बाब अशी की या स्पर्शेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत भाग घेता येईल. पण रब्बी हंगामात घेतल्या जाणाऱ्या या पिका स्पर्धेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना स्वत:च्या शेतावर त्या पिकाखाली किमान एक एकर क्षेत्रावर सलग लागवड करणं आवश्यक राहणार आहे. 

कस आहे स्वरूप

या योजनेत राज्य पातळीवर पहिल्या येणाऱ्या शेतकऱ्याला 50 हजार, दुसऱ्या येणाऱ्या शेतकऱ्याला चाळीस हजार आणि तिसऱ्या येणाऱ्या शेतकऱ्याला 30 हजार मिळणार आहेत.

तसेच जिल्हा पातळीवर पहिल्या येणाऱ्या शेतकऱ्याला दहा हजार, दुसऱ्या येणाऱ्या शेतकऱ्याला 7000 आणि तिसऱ्या येणाऱ्या शेतकऱ्याला 4000 दिले जाणार आहेत. तसेच तालुका पातळीवर पहिले येणाऱ्याला 4000, दुसऱ्याला 3000 आणि तिसऱ्या स्थानी विराजमान होणाऱ्याला 2000 मिळणार आहेत. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News