Maratha Reservation : अहमदनगर जिल्ह्यात सख्या बहिण भावाच्या दाखल्यांवर वेगवेगळ्या जातींची नोंद ! हा आहे का कुणबी व मराठा एक असल्याचा पुरावा?

Tejas B Shelar
Published:

Maratha Reservation:- सध्या मराठा आरक्षणाच्या प्रश्नाने महाराष्ट्रामध्ये गंभीर स्वरूप धारण केले असून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणाचा लढा अधिक तीव्र स्वरूपाचा झालेला आहे. नुकतेच महाराष्ट्र सरकारने 2 जानेवारी पर्यंत मराठा आरक्षणाच्या बाबतीत निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतले.

या आंदोलनामध्ये मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे ही जरांगे पाटील यांचे प्रमुख मागणी आहे. त्या दृष्टिकोनातून आता सरकारने देखील कुणबी नोंदी शोधण्याचे काम सुरू केले असून मराठवाड्यातील तेरा हजारच्या आसपास कुणबी नोंदी सापडलेल्या व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आलेली आहे.

एवढेच नाही तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना कुणबी नोंदी शोधण्याचे निर्देश दिले असून त्याचा प्रगती अहवाल प्रत्येक आठवड्याला सादर करण्याचे देखील निर्देश दिलेले आहेत. परंतु या सगळ्यांमध्ये कुणबी आणि मराठा नेमके एकच जात आहे की वेगवेगळ्या हा देखील मोठा प्रश्न आहे.

या सगळ्या प्रश्नाला फार मोठा इतिहास असून याबाबतीत तज्ञांमध्ये देखील विविध मतमतांतरे आहेत. परंतु जर आपण अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्याच्या विचार केला तर त्या ठिकाणी बऱ्याच कुटुंबांमध्ये सख्ख्या बहिण भावांच्या शाळेच्या दाखल्यांवर वेगवेगळ्या प्रकारच्या जातींची नोंद आढळून आली आहे.

म्हणजेच बहिणीच्या शाळेच्या दाखल्यावर कुणबी तर भावाच्या शाळेच्या दाखल्यावर मराठा अशा प्रकारची नोंद आहे. सख्ख्या बहिण भावाच्या दाखल्यावर वेगवेगळ्या नोंदी असल्यामुळे मराठा म्हणजेच कुणबी असल्याचा हा पुरावा आहे. त्यामुळे शासनाने मराठा समाजाला कुणबी आरक्षण ताबडतोब द्यावी अशी आशयाची मागणी आता होताना दिसून येत आहे.

जामखेड तालुक्यात सख्या बहिण भावांच्या दाखल्यांवर जातीच्या वेगळ्या नोंदी

याबाबत सविस्तर वृत्त असे की, जामखेड तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी एकाच कुटुंबातील भाऊ आणि बहिण यांच्या शाळेच्या दाखल्यांवर वेगवेगळ्या जातींची नोंद आढळून आली आहे. भावाच्या दाखल्यावर मराठा अनेक बहिणीच्या दाखल्यावर कुणबी अशा प्रकारच्या नोंदी असल्यामुळे मराठा म्हणजेच कुणबी असल्याचा हा पुरावा मानला जात आहे.

त्यामुळे शासनाने मराठा समाजाला कुणबी आरक्षण द्यावे अशी मागणी होताना दिसून येत आहे. जामखेड तालुक्यातील मोरे कुटुंबात बहिण कुणबी तर भाऊ मराठा अशी नोंद शाळेच्या दाखल्यावर आढळून आली आहे. यामध्ये बहिणीचे नाव चंद्रभागा भाऊ मोरे अजून त्यांच्या दाखल्यावर हिंदू कुणबी अशी नोंद आहे तर त्यांचाच भाऊ दिगंबर भाऊ मोरे यांच्या दाखल्यावर हिंदू मराठा अशी नोंद आहे.

त्यामुळे आता मराठा समाजाला कुणबी आरक्षण देण्यात यावे अशी मागणी जोर धरू लागली आहे. सख्खे बहीण भावांच्या दाखल्यांवर अशाप्रकारे वेगवेगळ्या जातींची नोंद असल्यामुळे अनेक जणांची अशाच नोंदी सापडत असल्यामुळे देखील एक पेच निर्माण झाला आहे. परंतु जामखेड तालुक्यामध्ये अनेक कुटुंबांमध्ये अशाच नोंदी आहेत.

जामखेड तालुक्यातील जर साकत या गावाचा विचार केला तर या ठिकाणी 1920 या वर्षापर्यंतचे जे दाखले आहेत त्यांच्यावर कुणबी अशी नोंद आहे तर 1920 नंतर मात्र त्या ठिकाणी मराठा नोंद लागले आहेत.

जामखेड व्यतिरिक्त आंबेगाव तालुक्यात देखील दोन भावंडांची प्रमाणपत्रे सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे प्रशासकीय कारभारा बाबत मात्र यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेले आहे. त्यामुळे मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे आता येणाऱ्या काळात याबाबत काय निर्णय घेतला जातो हे पाहणे गरजेचे आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe