Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यामध्ये प्रसिद्ध असलेल्या एका वैद्यकीय महाविद्यालयात नमाज पठण करायला लावल्याचा आरोप करण्यात येत आहे.
ही घटना समजताच जमाव संतप्त झाला होता. या घटनेची माहिती समजताच सोमवारी रात्री १० वाजेच्या सुमारास कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात कारवाईची मागणी करण्यासाठी मोठी गर्दी करण्या आली होती.
असे म्हटले जात आहे की, या महाविद्यालयात संबंधित प्राचार्य व इतरांनी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना कॉलेजच्या एका हॉलमध्ये जमा केले होते व त्यानंतर त्यांना नमाज पठण करायला लावून व धर्मांतर करण्यासाठी प्रवृत्त केले जात असल्याचा आरोप या वेळी करण्यात येत होता.
या घटनेची माहिती शहरात वाऱ्याच्या वेगाने पसरताच शहरातील सर्व सकल हिंदू समाज व सर्व हिंदूप्रेमी संघटनांनी संबंधित ट्रस्टी व नमाज पठण करायला लावणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली.
या वेळी कोपरगाव शहर पोलिस स्टेशनच्या आवारात मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी हिंदू संघटनांनी केली. येथे या प्रकारामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता अशी माहिती मिळाली आहे.