Namo Shetkari Yojana : नमोच्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. खरंतर केंद्र सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 21 वा हप्ता काल 19 नोव्हेंबर 2025 रोजी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आला असून याच योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या संदर्भात सुद्धा एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
पी एम किसान सन्माननिधी योजनेच्या पात्र शेतकऱ्यांना केंद्रातील सरकारकडून दरवर्षी सहा हजार रुपयांचा लाभ मिळतो. दोन हजार रुपयांचा एक हप्ता या पद्धतीने या पैशांचे वितरण केले जाते. प्रत्येक चार महिन्यांनी या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना दोन हजार रुपयांचा हप्ता मिळतो.

दरम्यान याच योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी योजना सुरू करण्यात आली असून या योजनेच्या माध्यमातूनही पात्र शेतकऱ्यांना 6000 रुपये मिळतात. म्हणजेच महाराष्ट्रातील पीएम किसान च्या पात्र लाभार्थ्यांना केंद्राचे सहा हजार आणि राज्याचे 6000 असे एकूण 12 हजार रुपये दिले जातात.
पी एम किसान च्या शेतकऱ्यांना आत्तापर्यंत एकूण 21 हफ्ते मिळाले आहेत आणि नमो च्या शेतकऱ्यांना आतापर्यंत एकूण सात हप्ते वितरित करण्यात आले आहेत. दरम्यान आता नमोच्या शेतकऱ्यांना आठवा हप्ता कधी मिळणार या संदर्भात एक नव अपडेट समोर आलं आहे.
खरे तर पी एम किसानचा एक विश्वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे यामुळे नमोचा आठवा हप्ता कधी मिळणार हा सवाल उपस्थित होतोय. महाराष्ट्रातील शेतकरी बांधव आठव्या हफ्त्याबाबत विचारणा करत आहेत.
पी एम किसान च्या 21 व्या हप्त्यासोबतच नमो चा आठवा हप्ता वितरित करण्यात येईल असा सुद्धा अंदाज मध्यंतरी वर्तवण्यात आला होता. पण महाराष्ट्र राज्य शासनाने अजून नमोच्या आठव्या हप्त्याबाबत निर्णय घेतलेला नाही.
कधी मिळणार नमो चा आठवा हप्ता?
जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्रातील पीएम किसानचा हप्ता जमा झाल्यानंतर राज्य सरकार नमोचा हप्ता वितरित करण्याबाबतची प्रक्रिया सुरू करते. पीएम किसानचा हप्ता जमा झाल्यानंतर महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांची अद्ययावत यादी राज्य सरकारकडून मागवली जाते.
केंद्रातील सरकारकडून ही यादी राज्य सरकारकडे हस्तांतरित झाल्यानंतर मग नमोच्या हप्त्याचे वितरण सुरू होते. यानुसार पाहिले तर नमोचा आठवा हप्ता डिसेंबर महिन्यात जमा होण्याची शक्यता आहे. अद्याप या संदर्भात अधिकृत माहिती समोर आलेली नाही पण डिसेंबर मध्ये या योजनेचा पैसा मिळू शकतो.
तसेच काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू असल्याने आचारसंहिता संपल्यानंतरच नमोचा आठवा हप्ता शेतकऱ्यांना मिळेल असाही दावा करण्यात आला आहे.













