अहमदनगर :- उन्हाळी कांदा लागवड मोठ्या प्रमाणावर झाली. उत्पादन चांगले झाले, परंतू भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांनी कांदा तसाच चाळीत साठवून ठेवला. मात्र आता तो कांदा आता चाळीत सडू लागला आहे. त्यामुळे ऐन दुष्काळात हातातोंडाशी आलेला घास देखील गेल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.
जायकवाडी परिसरात काळी कसदार जमीन, मुबलक पाणी, कांद्यासाठी चांगले हवामान, कमी कालावधीत चांगले उत्पादन मिळवून देणारे पिक म्हणून या परिसरातील शेतकरी कांदा लागवड मोठ्या प्रमाणात करतात. गेल्यावर्षी उन्हाळी कांदा. त्यानंतर लाल कांद्याचे चांगले उत्पादन झाले.

कांदा काढली वेळी चांगला दर नसल्यामुळे शेतकऱ्यांनी कांदा शेडमध्ये चाळीत साठवून ठेवला. सात ते आठ महिने टिकणारा कांदा वर्षभर भाव न मिळाल्याने चाळीमध्ये सडत पडला. आता हा कांदा पुन्हा शेतामध्ये गाडून टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
यामुळे चालू वर्षी दुष्काळी परिस्थितीमध्ये कांदा विकून दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांना हा कांदा उपयोगी आला असता, परंतू भावच नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. शेतमाला बाबात शासनाच्या दुटप्पी धोरणामुळे शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे.