राहुरी :- तालुक्यातील ब्राह्मणी येथील मंगल पोपट भिसे या २९ वर्षांच्या विवाहितेचा मृतदेह गुरुवारी रात्री गावातील एका विहिरीत दगडाला बांधलेल्या स्थितीत आढळला.
मंगल ३ फेब्रुवारीपासून बेपत्ता झाल्याची फिर्याद पती पोपट भिसे याने राहुरी पोलिस ठाण्यात दिली होती.

File Photo
मंगलचा सासरा धोंडिराम सवाजी भिसे यांनी दिलेल्या फिर्यादीत अमोल चंद्रकांत साठे (३०, ब्राह्मणी) व भागोजी तुळशीराम वीरकर (३८, धनगरवाडी, नेवासे) यांना मंगलच्या मृत्यूस जबाबदार धरण्यात आले आल्यामुळे या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.