अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :- आपल्या शेतात असलेल्या एका महिलेकडे जाऊन, हे शेत मी विकत घेतलेले आहे.
तुम्ही येथे यायचे नाही असे म्हणत फिर्यादी पीडित महिलेचा येथील एका सावकाराने विनयभंग केल्याचा धक्कादायक व खेदजनक प्रकार जामखेड तालुक्यात घडला आहे.
याबाबत पीडित महिलेच्या फिर्यादीवरून जामखेड पोलिसांनी महादेव शिवदास खाडे या सावकरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर असे की, जामखेड तालुक्यातील डोळेवाडी येथील एका व्यक्तीने खाडे या सावकाराकडून मासिक ३ टक्के शेकडा या व्याजदाराने पावणेदोन लाख रूपये घेतले होते.
त्या बदल्यात खाडे यास त्याची काही शेती खरेदी करून दिली होती. दरम्यान बुधवारी (दि.२४) सकाळी सावकाराचे पैसे परत देण्यासाठी फिर्यादी महिलेचा पती पैसे आनण्याकरिता बाहेर गेला होता.
व पीडित महिला जनावरे घेऊन शेतात गेली होते. यावेळी तेथे खाडे आला व फिर्यादी महिलेस म्हणाला की, हे शेत मी विकत घेतलेले आहे.
तुम्ही येथे यायचे नाही असे म्हणुन तिचा विनयभंग केला. याप्रकरणी खाडे याच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम