श्रीगोंद्यात पुन्हा एकदा बाळासाहेब नाहाटा किंगमेकर

Published on -

अहमदनगर Live24 टीम,10 ऑगस्ट 2020 :-  श्रीगोंदा कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापतिपदाची निवड प्रक्रिया अत्यंत चुरशीने झाली. या निवड प्रक्रियेत जगताप, नागवडे गटाचे संजय जामदार यांनी १० मते मिळवत सभापतीपदी बाजी मारली.

तर पाचपुते गटाचे उमेदवार लक्ष्मण नलगे यांना ७ मते मिळाली. तसेच मीना आढाव यांना १ मत मिळाले आहे. उपसभापती संजय महांडुळे यांनी १० मते मिळवत बाजी मारली तर विरोधी गटाचे वैभव पाचपुते यांना ८ मते मिळाली आहेत.

सभापती पदासाठी लक्ष्मण नलगे, मीना आढाव, संजय जामदार या तिघांनी उमेदवारी अर्ज भरले होते. तर उपसभापतीपदासाठी संजय महांडुळे, वैभव पाचपुते आणि मीना आढाव या तिघांनी अर्ज दाखल केले होते.

मात्र आढाव यांनी अर्ज मागे घेतला. यामुळे पाचपुते आणि महांडुळे यांच्यात लढत झाली. सभापती आणि उपसभापतीपद माजी आ. राहुल जगताप आणि नागवडे कारखाना अध्यक्ष राजेंद्र नागवडे गटांकडे आले आहे.

श्रीगोंद्यात पुन्हा एकदा बाळासाहेब नाहाटा किंगमेकर श्रीगोंदा पंचायत समितीच्या निवडीमध्ये बाळासाहेब नाहाटा यांची सर्वश्रेष्ठींनी केलेली कोंडी आणि संजय जामदार यांना सभापती होऊ न देण्याची खेळी त्यांना खटकत होती.

म्हणून वेळ येताच बाळासाहेब नाहाटा यांनी सर्वश्रेष्ठींवर कडी करून संजय जामदार यांना दहा मते मिळवून निवडून आणले.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News