अहमदनगर ब्रेकिंग : दोन वाहनांच्या अपघातात एक ठार; सहा जखमी

Ahmadnagar Braking

Ahmadnagar Braking : माल वाहतूक करणाऱ्या दोन पीकअप वाहनांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले. हा अपघात श्रीगोंदा तालुक्यातील निमगाव खलू परिसरात झाला.

हर्षद सुरेश गायकवाड (वय २३) वर्ष रा. आगार फाटा, ता. मालेगाव असे अपघातातील मयताचे नाव आहे. याप्रकरणी सोमनाथ भिमराव गडदे रा. सर्वत्सर, ता. कोपरगाव यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चालकावर श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

अपघातात संतोष भानुदास गोधे (वय ४५), विजय संतोष गोधे (वय १९), दोघे रा. शिंगणापुर, ता. कोपरगाव, विनायक दिनानाथ गांगुर्डे (वय १८) वर्षे, संजय गोविंद गोधे (वय १९), सागर पांडुरंग गोधे (वय २२) तिघे रा. सदर, ज्ञानदेव गायकवाड रा. कोपरगाव हे सहा जण गंभीर जखमी झाले.

याबाबत पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसारः फिर्यादी हे त्यांच्या ताब्यातील पिकअप (एम. एच. १७ बी. वाय. २३३३) मधून अहमदनगरकडून दौंड कडे जात असताना निमगाव खलु परिसरात समोरून भरधाव आलेल्या पिकअप (एम पी ४६ जी २६४४) वरील अज्ञात चालकाने फिर्यादीच्या वाहनास समोरुन जोराची धडक दिली.

या अपघातात हर्षद सुरेश गायकवाड, या तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर सहा जण गंभीर जखमी झाले. जखमींवर उपजिल्हा रुग्णालय, दौंड तसेच पुणे येथील ससून हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe