अहमदनगर ब्रेकिंग : अपघातात एक ठार, एक जखमी ! निष्पाप बळी…

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmadnagar Braking

Ahmadnagar Braking : टाकळीभान येथील लोखंडे फॉलच्या नजिक टाकळीभान- नेवासा रोडवर शुक्रवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वार प्रशांत ऊर्फ किरण अरुण साठे (वय २८) याला गंभीर मार लागुन त्याचा मृत्यू झाला.

तर अपघातात गंभीर जखमी झालेल्या नितीन डुकरे (वय ३५, दोघे रा. पिंपळगाव) यांच्यावर लोणी येथील प्रवरा हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी, की अपघातात जोराची धडक लागुन गंभीर मार लागल्याने साठे याचा उपचारवेळी मृत्यू झाला.

याबाबत पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर नितीन डुकरे यांच्यावर लोणी येथील प्रवरा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. श्रीरामपूर नेवासा रस्त्यावर वाहनाच्या वेगावर नियंत्रण नसल्याने रोडवर अपघातांची संख्या वाढत आहे.

त्यामुळे हकनाहक निष्पाप बळी जात आहेत. तरुणांच्या अपघाताच्या घटनेमुळे पिंपळगावमध्ये शोककळा पसरली असून या घटनेबद्दल हळहळ व्यक्त होत आहे. अपघातात मयत साठे यांच्या अंत्यविधी प्रसंगी मोठा जनसमुदाय जमला होता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe