Operation Sindoor : पाकिस्तानच्या हद्दीत 100 किमी आत घुसून सर्जिकल स्ट्राईक ! जाणून घ्या कोणती 9 ठिकाणं होती टार्गेट?

Published on -

Operation Sindoor : भारताने पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पीओकेमधील ९ दहशतवादी तळांवर मध्यरात्री हल्ले केले. भारतीय सशस्त्र दलांनी तिन्ही सैन्यदलांच्या समन्वयाने ही धाडसी कारवाई केली.

रॉ (RAW) च्या गुप्तचर माहितीच्या आधारे निश्चित केलेल्या या ठिकाणांवर अचूक हवाई हल्ले करून लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मदच्या तळांचा नाश करण्यात आला. विशेष म्हणजे, कोणत्याही नागरी वस्तीला हानी न पोहोचवता केवळ दहशतवादी अड्ड्यांनाच लक्ष्य करण्यात आले.

मंगळवारी मध्यरात्री १:३० च्या सुमारास भारतीय हवाई दलाने पाकिस्तान आणि पीओकेमधील या ९ ठिकाणांवर एकाच वेळी हवाई हल्ले केले. पाकिस्तानमधील ४ आणि पीओकेमधील ५ तळ उद्ध्वस्त करण्यात आले. या कारवाईत प्रिसिजन अटॅक सिस्टीमचा वापर करून दहशतवादी तळांना अचूकपणे लक्ष्य करण्यात आले.

पाकिस्ताननेही कोटली, बहावलपूर आणि मुझफ्फराबादमधील हल्ल्यांची पुष्टी केली आहे. भारताच्या या धाडसी कारवाईने दहशतवाद्यांचे मोठे नुकसान झाले असून, जगासमोर दहशतवादाविरोधातील ठाम भूमिका भारताने मांडली आहे.

लक्ष्य केलेली ९ ठिकाणे

बहावलपूर: जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख तळ, आंतरराष्ट्रीय सीमेपासून १०० किमी आत.

मुरीदके: लष्कर-ए-तैयबाचा गड, २६/११ च्या मुंबई हल्ल्याशी संबंधित, सीमेपासून ३० किमी अंतरावर.

गुलपूर: पीओकेमधील तळ, पूंछ-राजौरीपासून ३५ किमी, २०२३ आणि २०२४ च्या हल्ल्यांचे मूळ.

भीमबर: पीओकेमधील दहशतवादी प्रशिक्षण केंद्र.

चक अमरु: पीओकेमधील लष्कर-ए-तैयबाचा तळ.

बाग: पीओकेमधील दहशतवादी कारवायांचे केंद्र.

कोटली: पीओकेमधील जैश-ए-मोहम्मदचा अड्डा.

सियालकोट: पाकिस्तानातील दहशतवादी तळ, लष्कर-ए-तैयबाशी संबंधित.

मुझफ्फराबाद: पीओकेमधील प्रमुख दहशतवादी केंद्र, हल्ल्यानंतर वीजपुरवठा खंडित.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe