पाथर्डी :- विकासकामांच्या माध्यमातून प्रत्येक समाजाला न्याय देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला. शेवगाव व पाथर्डी मतदारसंघात मुस्लिम समाजाच्या जमातखान्यासाठी विविध गावांत मिळून सव्वा कोटीची कामे पूर्ण झाली.
सर्वांचे योगदान लाभल्यास कामाची गती वाढण्यास मदत होते, असे आमदार मोनिका राजळे यांनी सांगितले. कसबा भागातील मुस्लिम समाजाच्या जमातखान्यासाठी अल्पसंख्याक निधीतून दहा लाख खर्चाच्या कामाच्या भूमिपूजनप्रसंगी राजळे बोलत होत्या.
