अहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 : काल एका खेळाडूला कोरोना झाला. पण आज मात्र त्याचा अहवाल निगेटीव्ह आल्याने सर्वत्र चर्चेचा विषय झाला आहे. पाकिस्तानचा अनुभवी खेळाडू मोहम्मद हफिझ याच्या बाबतीत अस झालं आहे.
त्यामुळे कोरोना टेस्टिंगवर नेमका कसा विश्वास ठेवायचा असा प्रश्न तेथील नागरिकांसमोर उभा ठाकला आहे. इंग्लंडच्या दौऱ्यावर जाण्यासाठी पाकिस्तानचा संघ सज्ज झाला होता.

काल संघातील सर्व खेळाडूंचा अहवाल आला. त्यावेळी पाकिस्तानच्या सात खेळाडूंना कोरोना झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे पाकिस्तानच्या संघात भितीचे वातावरण होते.
पण या संघातील अनुभवी खेळाडूने आज करोनाची चाचणी केली आणि त्याचा अहवाल निगेटीव्ह आल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे आता पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या कोरोना चाचणी अहवालावर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews