Breaking ! हाय सेक्स प्रोफाईल रॅकेटवर पोलिसांचा छापा ! चार परप्रांतीय मुलींची सुटका

Ahmednagarlive24 office
Published:
Breaking

Breaking : शिर्डी येथील स्पा सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटवर शिर्डी उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने छापा टाकून चार परप्रांतीय पीडित मुलींची सुटका केली असून एक महिला आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की शिर्डी शहरातील पिंपळवाडी रोडच्या बाजूस स्पा सेंटरच्या नावाखाली येथे हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट चालवून वेश्याव्यवसाय करून घेतला जात आहे, अशी खात्रीशीर बातमी पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांना मिळाली होती,

त्यानंतर मिटके यांनी स्वतः पथक नेमून चक्रे फिरवली. याठिकाणी बनावट ग्राहक पाठवून पंचांसमक्ष छापा टाकून चार पीडीत परप्रांतीय मुलींची सुटका केली. या ठिकाणाहून एक महिला एजंट आरोपीला ताब्यात घेण्यात आले

आरोपींविरुद्ध अनैतिक व्यापारास प्रतिबंध कायद्यानुसार महिला पोलीस कर्मचारी सुनंदा भारमल यांच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलीस स्टेश्न येथे गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक, राकेश ओला, श्रीरामपूरच्या अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक मिटके, पोलीस निरीक्षक सोपान शिरसाठ, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे,

हेड कॉन्स्टेबल इरफान शेख, अशोक शिंदे, बाबा खेडकर, कॉन्स्टेबल सुनंदा भारमल, पोलीस नाईक श्याम जाधव, दिनेश कांबळे, सोमेश गरदास, हेड कॉन्स्टेबल आप्पासाहेब थोरमिसे यांनी केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe