जामखेड :- तालुक्यातील भोगलवाडी येथे घरात एकटी असल्याचे पाहून आरोपीने अकरावीच्या तरुणीवर बलात्कार केला. या प्रकरणी जामखेड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, जामखेड तालुक्यातील भोगलवाडी (कुसडगाव) येथील ही घटना आहे. पीडिता ही आजी आजोबा व भावासोबत राहते. तर आई-वडील ऊसतोडणीसाठी इंदापूरला गेले होते.

रविवारी अकरावीत शिकणारी पीडिता घरात एकटी होती. याचा गैरफायदा घेत आरीपी सचिन म्हणू वाघ याने घरात बळजबरीने प्रवेश करत तरुणीवर बलात्कार केला. शेतात गेलेले आजी-आजोबा घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.