Ahmadnagar Breaking : जमिनीच्या वादातून तालुक्यातील आदर्शगाव वडुले ग्रामपंचायतीचे सरपंच दिनकर गर्जे यांच्या मुलावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना गुरुवारी (दि. ३०) घडली. याप्रकरणी नऊ जणांविरुद्ध नेवासा पोलिस ठाण्यात जिवे ठार मारण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत प्रल्हाद दिनकर गर्ने (रा. वडले. ता. नेवासा) यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबावरून गुन्हा दाखल केला आहे. वडील दिनकर गर्ने गुरुवारी (दि.३) सकाळी दहा वाजता देवगड येथे चालले होते.
नांदुर वडुले रस्त्यावर प्रभाकर एकनाथ गर्जे याने त्यांना थांबविले. जमीन विकत का घेतली? ती जमीन मी घेणार होतो, असे म्हणून शिवीगाळ केली, तुझ्या कुटुंबाला जिवे ठार मारील, अशी धमकी दिनकर गर्ने यांना दिली.
त्यानंतर गर्ने हे घरी आले. कुटुंबीयांना तुम्ही बाहेर कोठे जाऊ नका, असे सांगून देवगडला दर्शनासाठी निघून गेले. त्यानंतर साडेबाराच्या सुमारास फिर्यादी प्रल्हाद, पत्नी रूपाली, भाऊ ज्ञानेश्वर, भावजयी प्रज्ञा हे घरी होते.
त्यावेळी प्रभाकर एकनाथ गर्जे, वसंत एकनाथ गर्जे, एकनाथ महादू गर्जे, अर्जुन मच्छिंद्र आतकरे, इंद्रजित अर्जुन आतकरे, गीता प्रभाकर गर्ने, शीतल वसंत गर्जे, सीताबाई एकनाथ गर्ने, रंजना अर्जुन आतकरे हे (सर्व रा. वडुले, ता. नेवासा) हे शिवीगाळ करत फिर्यादी गर्जे यांच्या घरात घुसले.
प्रभाकर एकनाथ गर्जे याने हातातील कुन्हाडीने प्रल्हाद यांच्यावर वार केला. तो वार डाव्या हाताच्या दंडावर लागला. तसेच अर्जुन मच्छिंद्र आतकरे याने हातातील कत्तीने वार केला.
तो हनुवटीवर लागला. त्याने केलेला दुसरा वार छातीवर लागला. यावेळी फिर्यादीचा भाऊ ज्ञानेश्वर गर्ने याच्यावर वसंत एकनाथ गर्ने याने कोयत्याने वार केला. एकनाथ महादू गर्जे यानेही गजाने ज्ञानेश्वरला मारहाण केली. असे फिर्यादीत म्हटले आहे.